झूम अ‍ॅपमध्ये लवकरच दाखल होणार हे 9 फीचर्स

लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले अ‍ॅप हे झूम आहे. व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप असलेल्या झूम एवढी झपाट्याने लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याच अ‍ॅपने मिळवली नाही. मात्र प्रायव्हेसी आणि सिक्युरिटीच्या कारणामुळे हे अ‍ॅप न वापरण्याचे आवाहन अनेकजण करत आहेत. मात्र आता अ‍ॅप 9 खास फीचर्स युजर्ससाठी आणणार आहे.

डाटा सिक्युरिटी –

अधिकृत ब्लॉग पोस्टनुसार, झूम एईएस 256 बीट जीसीएम एनक्रिप्शन स्टँडर्ड अपग्रेड करणार आहे. थोडक्यात, मिटिंग डेटा अधिक सुरक्षित आणि गोपनीय राहणार आहे.

Image Credited – Gadgets Now

सिक्युरिटी फीचर्ससाठी नवीन आयकॉन –

झूम युजर्सला आता सिक्युरिटी फीचर्स वापरणे सोपे होणार आहे. आधी सिक्युरिटी फीचर्सचा पर्याय मिटिंग मेन्यूमध्ये दिसत असे. मात्र आता यासाठी खास आयकॉन देण्यात येणार आहे.

पासवर्डसाठी अधिक सुरक्षा –

क्लाउट रेकॉर्डिंग वापरणाऱ्यांसाठी झूम कॉम्पलॅक्स पासवर्ड फीचर आणत आहे. याद्वारे अ‍ॅडमिनिस्ट्रेड अकाउंट्स, अकाउंट अ‍ॅडमिन पासवर्ड ठरवू शकतात. यामुळे प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित होईल.

Image Credited – Gadgets Now

मिटिंग आयडी चुकीने शेअर करणे होणार अवघड –

झूमने मिटिंग आयडी आणि इनव्हाईटचा पर्याय मुख्य इंटरफेसवरून बदलून पार्टिसिपंट मेन्यूमध्ये दिला आहे. यामुळे युजर्सला मिटिंग आयडी शेअर करणे अवघड होईल.

कंपन्यांसाठी मिटिंग, चॅटची सोपी सुविधा –

झूमच्या नवीन व्हर्जनमध्ये कंपन्यांना अनेक अकाउंट लिंक करण्याची सुविधा मिळेल. यामुळे मिटिंग, चॅट्स आणि फोन कॉन्टॅक्ट्स सर्च करणे सोपे आणि सुरक्षित होईल.

Image Credited – Gadgets Now

रिपोर्ट –

नवीन व्हर्जनमध्ये होस्ट्स सिक्युरिटी आयकॉनद्वारे युजर्सबाबत रिपोर्ट करू शकतात. याशिवाय सहभागी युजर्सला स्वतःचे नाव बदलण्याची परवानगी देखील देऊ शकत नाहीत.

वेटिंग रुम –

वेटिंग रुम फीचरमध्ये देखील कंपनीने बदल केला आहे. होस्ट्स थेट वेटिंग रुम फीचर मिटिंग चालू असताना सुरू करू शकतो. याशिवाय शैक्षणिक, बेसिक आणि सिंगल-लायसन्स प्रो अकाउंटमध्ये हे फीचर मिळेल.

Image Credited – Gadgets Now

झूम डॅशबोर्ड –

बिझनेस, एंटरप्रायझेस आणि शैक्षणिक प्लॅन्सचे अ‍ॅडमिन झूम डेटा सेंटर्सशी मिटिंग कसे कनेक्ट करत आहेत, ते डॅशबोर्डद्वारे पाहू शकतात.

चॅट नॉटिफिकेशन –

युजर्सला चॅटचे स्निपेट न दाखवण्याचा देखील पर्याय आता मिळणार आहे.

Leave a Comment