भारतीय डॉक्टर ला अमेरिकेत आगळा सन्मान


फोटो साभार पत्रिका
अमेरिकेच्या न्युयॉर्क करोना वॉरीयरचे आभार मानून त्यांचा सन्मान करण्याचा एक वेगळा मार्ग अमेरिकन पोलीस, फायर ब्रिगेड आणि स्थानिक नागरिकानी स्वीकारल्याचा एक व्हिडीओ नुकताच शेअर केला गेला आहे. यात भारतीय डॉक्टर उमा मधुसूदन यांचा सन्मान आगळ्या पद्धतीने केला गेला.

उमा मधुसूदन यांनी मैसूरच्या जेएसएस मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस पदवी मिळविली असून त्या सध्या साउथ विंडसर हॉस्पिटल मध्ये काम करत आहेत. अमेरिकेत करोनाचा उद्रेक झाल्यापासून सतत डॉ, उमा करोना पेशंटवर अहोरात्र उपचार करत आहेत. त्यांच्या या योगदानबद्दल त्यांना हा सन्मान दिला गेला असून त्यांना अनसंग हिरो अशी ओळख प्राप्त झाली आहे.

व्हिडीओ मध्ये डॉ. उमा त्याच्या घराबाहेर उभ्या दिसत आहेत. तेवढ्यात एक काळी एसयुव्ही येते आणि त्यातून खाली उतरलेला माणूस डॉ. उमा, अनसंग हिरो असे पोस्टर लावतो. त्या पाठोपाठ १०० गाड्यांचा ताफा येतो. आत बसलेले लोक हातात ‘थँक यु’ चे कार्ड धरून हॉर्न वाजवितात आणि कार्सचे लाईट ब्लिंक करून डॉ. उमा याना मानवंदना देताना दिसत आहेत. या ताफ्यात पोलीस, फायरब्रिगेड, स्थानिक प्रशासन अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांचा समावेश असल्याचे समजते.

Leave a Comment