लॉकडाऊन : या पठ्ठ्याने चक्क ड्रोनच्या मदतीने पकडला मासा

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवासोडून सर्वकाही बंद असल्याने लोकांना काहीवेळेस गरजेच्या वस्तू मिळत नाही. अशा स्थितीमध्ये अनेकदा ड्रोनच्या सहाय्याने विशिष्ट वस्तू पोहचवल्या जात आहे. काही दिवसांपुर्वीच ड्रोनच्या मदतीने व्हिस्की, टॉयलेट पेपर आणि पान मसाला पोहचवल्याचे व्हिडीओ समोर आले होते. आता याही पुढचा टप्पा म्हणजे या पठ्ठ्याने लॉकडाऊनमध्ये मासे पकडण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर केला आहे.

ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने लॉकडाऊनमुळे घरात कैद असताना ड्रोनच्या मदतीने मासा पकडला आहे. सिडनीमध्ये आपल्या मित्राच्या घरी असलेल्या सॅम रोमियोने घरात बसून कंटाळा आल्याने ड्रोनच्या मदतीने मासेमारी करण्याची निर्णय घेतला.

https://www.instagram.com/p/B_JSLLqBnb7/?utm_source=ig_web_copy_link

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, व्हिडीओमध्ये दिसत आहे की सॅम बाल्कनीमध्ये उभा राहून ड्रोनच्या मदतीने मासा पकडतो. 30 मिनिटे आणि 2 बॅटरी बदलल्यानंतर अखेर त्याच्या हाती मासा लागला. मात्र मासा छोटा असल्याने सॅमने त्याला पुन्हा त्याला पाण्यात सोडले.

सॅमला याआधी देखील मासेमारीचा अनुभव आहे. तो म्हणाला की, मी अशी अनेक कामे केली आहेत, ज्यात ड्रोनला काही गोष्टी लटकवून ठेवाव्या लागतात. कार्यक्रमात लग्नाची अंगठी ड्रोनद्वारे पोहचवण्याचे देखील काम केले आहे.

Leave a Comment