लॉकडाऊनचा सदुपयोग, या जोडप्याने 21 दिवसात खोदली 25 फूट विहीर

देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. अशा स्थिती लोक स्वतःला कामात गुंतवून ठेवण्यासाठी आणि स्वतःचे मनोरंजन होण्यासाठी विविध मार्ग शोधत आहेत. मात्र महाराष्ट्रातील एका जोडप्याने याही पेक्षा पुढचे पाऊल टाकत वेळेचा सदुपयोग करत घरा शेजारी विहीरच खोदली आहे. यासोबतच त्यांचा पाण्याचा प्रश्नच कायमचा मिटला आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारखेड गावातील गजानन पाकमोडे आणि त्यांच्या पत्नी पुष्पा यांनी ही कामगिरी केली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 21 दिवसात त्यांनी 25 फूट खोल विहीर खोदली आहे.

गजानन पाकमोडे यांनी सांगितले की, लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही बाहेर जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे पत्नी आणि मी काहीतरी करायचे ठरवले. मी पत्नीला पुजा करण्यास सांगितली व त्यानंतर विहीर खोदण्यास सुरूवात केली. आमच्या शेजाऱ्यांनी थट्टा केली, मात्र आम्ही काम सुरूच ठेवले. अखेर 21 व्या दिवशी 25 फूट खोल खोदल्यानंतर पाणी लागले.

गजानन हे गंवडी कामगार आहे. आपल्या अनुभवाचा उपयोग करून घेत त्यांनी पत्नीसोबत मिळून होल खोदली. त्यांच्या दोन लहान मुलांनी देखील त्यांना या कामात मदत केली. विहीर खोदण्यासाठी त्यांनी कोणत्याही मशीनचा वापर केला नाही. त्यांनी हातानेच मोजक्या साधनांद्वारे संपुर्ण विहीर खोदली.

त्यांनी सांगितले की, विहीर खोदण्याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक पाणीपुरवठा योजना बहुतेक वेळा बंदच असते आणि नळाकडे बघत राहण्यापेक्षा विहीर खोदणे चांगला पर्याय होता.

Leave a Comment