व्हिडीओ – या 7 वर्षीय मुलीच्या बॅटिंगचे दिग्गजांकडून होत आहे कौतूक

सोशल मीडियावर सध्या एका 7 वर्षीय मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुलगी फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. या मुलीची फलंदाजीची शैली इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि वेस्टइंडीजचा खेळाडू शाई हॉपला देखील एवढी भावली की, त्यांनी तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

मायकल वॉन यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हा व्हिडीओ एकदा बघाच…परी शर्मा….7 वर्षीय… तिचे मूव्हमेंट खरचं चांगले आहेत.

शाई होपने देखील हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मला परी शर्मा सारखे बनायला आवडेल.

याशिवाय भारतीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडेला एका ट्विटर युजर्सने टॅग करत लिहिले की, तू या खेळाडूला शोधायला हवे. यावर शिखाने देखील मजेशीर उत्तर दिले की, हो आणि तिच्याकडून काही क्लासेस घ्यायला हवे.

जगभरातील क्रिकेट चाहते परीच्या फलंदाची टेक्निक आणि फूटवर्कचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment