या बँकेने ग्राहकांसाठी लाँच केली चॅटबॉट सेवा, बोलून होणार सर्व कामे

आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी एक खास सेवा सुरू केली आहे. या सेवेचे नाव आयपल (Ipal) चॅटबॉट आहे. याद्वारे ग्राहक आपल्या स्मार्टफोन स्पर्श न करता थेट बोलून बँकेसंबंधी काम करू शकणार आहेत. हे चॅटबॉट गुगल असिस्टेंट आणि अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साला सपोर्ट करते.

आयसीआयसीआय बँकेने म्हटले की, आम्हाला ग्राहकांसाठी बँकिंग प्रक्रिया सोपी बनवायची आहे. त्यामुळे आम्ही आयपल चॅटबॉट लाँच केले आहे. हे चॅटबॉट अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा आणि गुगल असिस्टेंटला सपोर्ट करते. या संदर्भात आयसीआयसीआय बँकेने अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत देखील माहिती दिली.

याआधी आयसीआयसीआय बँकेने व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा देखील सुरू केली आहे. बँकेचे ग्राहक 9324953001 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेज पाठवून खात्यातील बँलेस, मागील 3 व्यवहार, क्रेडिटचे लिमिट, कर्जाची माहिती मिळवू शकतात. याशिवाय या सेवेद्वारे क्रेडिट-डेबिट कार्ड देखील ब्लॉक करता येते.

Leave a Comment