फेसबुकच्या कोट्यावधी युजर्सचा डाटा लीक, डार्कवेबवर विक्रीसाठी उपलब्ध

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या युजर्स डाटा वारंवार लीक होण्याच्या घटना मागील काही वर्षात घडत आहेत. आता पुन्हा एकदा तब्बल 26 कोटी युजर्सचा डाटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व 26.7 कोटी फेसबुक युजर्सचा डाटा डार्क वेबवर 542 डॉलर्सला (41,600 रुपये) विकला जात आहे.

लीक झालेल्या डाटामध्ये युजर्सचे नाव, फेसबुक आयडी, वय, लास्ट कनेक्शन आणि मोबाईल नंबर सारख्या माहितीचा समावेश आहे. मात्र लीक डाटामध्ये पासवर्ड असल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. या डाटाचा वापर पिशिंग अटॅक आणि स्पॅम ई-मेलसाठी केला जाऊ शकतो.

सिक्युरिटी रिसर्चर बॉब डियाचेंको यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या डाटा रिपोर्टला सर्वात प्रथम कॉम्प्रिटेक वेबसाईटने प्रकाशित केले आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की 26.7 कोटी फेसबुक युजर्सचा डाटा Elastisearch सर्व्हरवर उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त डाटाचा हॅकर्स फोरम देखील अपलोड करण्यात आला आहे. युजर्सचा हा डाटा थर्ड पार्टी अ‍ॅप आणि कॅशे-कुकिजद्वारे लीक झाल्याचे सांगितले जात आहे. Cyble च्या संशोधकांना व्हेरिफेकशनसाठी हा डाटा खरेदी देखील केला आहे. या डाटा लीकवर अद्याप फेसबुककडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment