लॉकडाऊनमुळे लाखो लीटर बियर नाल्यात ओतून देण्याची आली वेळ

कोरोना व्हायरसमुळे देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा, दुकाने, व्यवसाय बंद आहेत. लॉकडाऊनमुळे दिल्ली-एनसीआरमधील मद्य निर्मात्यांना हजारो लीटर बियर नाल्यात ओतून द्यावी लागत आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, आतापर्यंत एनसीआरमध्ये 1 लाख लीटर बियर नाल्यात ओतून देण्यात आली आहे. ही बियर बाटल्यांमध्ये न भरता तशीच प्लांटमध्ये पडून होती. बियरला खराब होण्यापासून वाचवण्यासाठी याच्या निर्मितीपेक्षा अधिक खर्च येईल. या कारणामुळे बियर प्लांट नाल्यात ओतून देत आहेत.

स्ट्रायकर अँड सोइ 7 चे ललित अहलावत यांनी गुरग्राम येथील आटलेटमधून 5 हजार लीटर बियर नाल्यात ओतून दिली. याच प्रमाणे प्रँकस्टरच्या प्रमोटर्सला 3 हजार लीटर बियर फेकून द्यावी लागली. एनसीआरमध्ये 50 बियर निर्मात्यांनी 1 लाख लीटरपेक्षा अधिक बियर नाल्यात ओतून दिली आहे. बियरला ताजे ठेवण्यासाठी प्लांटला त्यांना एका निश्चित तापमानात ठेवावे लागते व रोज त्याची तपासणी करावी लागते.

ब्रुअर्सचे म्हणणे आहे की, समस्या केवळ लॉकडाऊनच नाहीतर, लॉकडाऊननंतर सोशल डिस्टेंसिंगमुळे नागरिक दुकानांवर येण्याची शक्यता देखील कमी आहे. बियर कंपन्यांनी सरकारकडे होम डिलिव्हरीसाठी परवानगी मागितली होती. मात्र याला परवानगी मिळाली नाही.  ब्रुअर्सला केवळ उत्पादन खर्चच नाहीतर आधीच भरलेल्या लायसन्स फी आणि ड्यूटीचे देखील नुकसान होत आहे.

नॅशनल रेस्ट्रोरेंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या गुरूग्राम यूनिटचे प्रमुख हेड बंगा यांनी सांगितले की, मायक्रोब्रुअसरी लायसन्सवरच महिन्याला लाखो रुपये खर्च येतो. आमचे काम पुर्णपणे बंद आहे. मात्र लायसन्स फी, ड्यूटीज आणि कर 6 महिन्यांपर्यंत न घेतल्यास आम्ही कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकतो.

Leave a Comment