फेसबुक-जिओच्या करारानंतर महिंद्रांनी केले अंबानींचे कौतुक

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने जिओमध्ये तब्बल 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक घोषणा केली आहे. फेसबुक आणि रिलायन्समध्ये झालेला हा मोठा करार महत्त्वाचा मानला जात आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील या करारावरून मुकेश अंबानी यांचे अभिनंदन केले.  हा करार किती महत्त्वाचा आहे हे सांगत त्यांचे कौतूक देखील केले.

कोरोना व्हायरसचे संकट संपल्यानंतर हा करार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वचा ठरणार असल्याचे महिंद्रा म्हणाले.

फेसबुक जिओमध्ये करणार तब्बल 43,574 कोटींची गुंतवणूक

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, जिओचा फेसबुकसोबतच करार केवळ त्यांच्यासाठीच फायदेशीर नाही. सध्याच्या संकटाच्या काळातील हा करार कोरोना व्हायरसनंतर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असणार आहे. हे गृहितकाला अधिक बळकटी देते की जग एक नवीन विकास केंद्र म्हणून भारताकडे पाहिल. ब्राव्हो मुकेश !

या करारानंतर मुकेश अंबानी म्हणाले की, फेसबुक आणि रिलायन्सची ही भागीदारी भारताला जगातील प्रमुख डिजिटल सोसायटी बनवेल.

Leave a Comment