लतादीदींच्या हातात पिस्तुल, देताहेत वाढदिवस शुभेच्छा


फोटो साभार भास्कर
भारतरत्न, गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकौंटवर गाजलेल्या टीव्ही सिरीयल सीआयडी टीम सोबत काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे सीआयडी मधील एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारणारे मराठमोळे गुणी नट शिवाजी साटम यांना लतादीदी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे शेअर केलेल्या फोटोत लता दीदी चक्क एसीपी प्रद्युम्न यांच्यावर पिस्तुल रोखलेल्या पोझ मध्ये दिसत आहेत.

लतादीदींच्या या खास शुभेच्छा लोकांना आवडल्या आहेत. लतादीदी असेही म्हणतात, ‘ नमस्कार, सीआयडी एसीपी प्रद्युम्न वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. सीआयडी सिरीयल पुन्हा सुरु व्हावी अशी माझी इच्छा आहे.’

मागे दिलेल्या मुलाखतीत सुद्धा दिदींनी त्यांची सर्वात आवडती सिरीयल सीआयडी असल्याचे आणि नेमाने ती पाहत असल्याचे सांगितले होते. दिदींच्या इन्स्टाग्राम अकौंटवर हे फोटो शेअर केले गेले आहेत.

Leave a Comment