येथे आहे दुर्योधन आणि कर्णाचे मंदिर


फोटो साभार बोल्डस्काय
उत्तराखंड राज्य देवभूमी मानले जाते. महाभारतातील पात्रांशी संबंधित अनेक मंदिरे, वास्तू या राज्यात आहेत. या राज्यात कौरव राजकुमार दुर्योधन याचीही पूजा होते. तसेच कुंतीचा पहिला पुत्र आणि दुर्योधन मित्र कर्ण याचीही पूजा होते. उत्तरकाशी जिल्ह्यात जाखौली पासून जवळ टंस घाटी मधील सौर या गावी दुर्योधनाचे तर सारनौल या गावी कर्णाचे प्राचीन मंदिर आहे. दुर्योधनाचे हे मंदिर देशातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.

काही वर्षापूर्वी दुर्योधनाचे हे मंदिर शिवमंदिरात बदलले गेले आहे म्हणजे तेथे शिवलिंग स्थापन केले गेले आहे. मात्र येथे अजूनही सोन्याची कुऱ्हाड असून ती दुर्योधनाची मानली जाते आणि या कुऱ्हाडीची पूजा केली जाते.

sabhar

Leave a Comment