युट्यूब युजर आता यूपीआयद्वारे करू शकणार पेमेंट


नवी दिल्ली : भारतातील आपल्या यूजर्ससाठी युट्यूबने नवीन फिचर लॉन्च केले असून यूपीआय पेमेंट ऑप्शन या फिचरमध्ये देण्यात आला आहे. आता युट्यूब युजर्स या नव्या फिचरच्या मदतीने सुपरचॅट, मूव्ही रेंटल आणि इतर ट्रान्जॅक्शन अगदी सहज करू शकता. युजर्स याआधी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून पेमेंट करत होते. पण आता आपल्या बँक अकाऊंटच्या मदतीने ते यूपीआयने देखील पेमेंट करू शकतात. यूट्यूब प्रीमियम आणि यूट्यूब म्युझिक सब्सक्रिप्शनचे पेमेंटही यूजर्स आता या फिचरच्या माध्यमातून करू शकतात.

याबाबत माहिती देताना युट्यूबने सांगितले की, आता नव्या युपीआय पेमेंट ऑप्शनचा वापर सर्व यूपीआय अॅप्स करू शकतात. एका महिन्यासाठी, तीन महिन्यांसाठी हे प्रीपेड सब्सक्रिप्शन घेऊ शकता. दरम्यान, युट्यूबने हे फिचर आपल्या अशा नव्या युजर्ससाठी दिले आहे, जे युट्यूब प्रीमियमचा वापर करू शकतात. अशातच ज्या युजर्सना युट्यूब ओरिजिनल्स पाहायचे असेल त्यांना यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. युट्यूबने सध्या आपले काही ओरिजनल शो फ्रीमध्ये युजर्ससाठी दिलेले आहेत. याआधी ते फक्त प्रीमियम सब्सक्राइबर्ससाठी होते.

आता टिकटॉक अॅपप्रमाणे युट्यूब शॉर्ट्सवर काम करत असल्यामुळे आता युजर्स छोटे व्हिडीओ तयार करून अपलोड करू शकणार आहे. गुगलकडे मोठ्या प्रमाणावर लायसेन्स असलेले म्युझिक अल्बम आहेत. ज्याचा क्रिएटर आपल्या कंटेन्टसाठी वापर करू शकणार आहेत.

Leave a Comment