या कंपन्यांद्वारे चीनचा भारतीय बाजारात घुसखोरी करण्याचा प्रयत्न

चीनच्या कंपन्यांनी भारतीय बाजारात पेमेंट्स मोबिलिटी आणि ईकॉमर्स सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आधीच गुंतवणूक केली आहे. यातच चीनच्या अनेक कंपन्या भारतीय कंपन्यांमधील आपले स्टेक वाढवत आहे. भारताने एक आठवड्यापुर्वीच शेजारील देशांच्या परकीय गुंतवणुकीवर (एफडीआय) प्रतिबंध घातले आहेत.

11 एप्रिल 2020 ला एचडीएफसी लिमिटेडच्या एका रेग्युलेटरी फायलिंगद्वारे समोर आले की चीनची सेंट्रल बँक पिपल्स बँक ऑफ चायनाने आपला स्टेक 0.8 टक्क्यांवरून वाढवून 1.01 टक्के केला आहे. यानंतर सेबीने चीन आणि हाँगकाँगमध्ये असलेल्या मुख्य बेनेफिशरीच्या भारतीय कंपन्यांच्या भागधारकांची माहिती मागवली. यामुळे पाकिस्तान, उत्तर कोरिया, तायवान आणि इराणचे यूनिट्स देखील निशाण्यावर आले.

व्हेंचर फंड्सची भारतीय कंपन्यांमध्ये रुची –

अलिकडच्या काही महिन्यांत चीनच्या व्हेंचर फंड्सने भारतीय कंपन्यांमध्ये रुची दाखवली आहे. फॉसुन, दीदी, टेंन्सेन्ट आणि शाओमी यासारख्या नामांकित कंपन्या आणि फंड्सशिवाय शुनवेई, होरायझन्स आणि सायनोव्हेशन सारख्या चिनी कंपन्यादेखील भारतात खरेदीची संधी शोधत आहेत.

या क्षेत्रात रस –

सेंट्रम इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी संदीप उपाध्याय म्हणाले, चीनच्या व्हेंचर फंड्सचा भारताच्या उच्च-वाढीच्या कंपन्यांमध्ये रस वाढला आहे. चीनमध्ये साथीच्या आजाराचा सर्वात वाईट टप्पा संपुष्टात आला आहे, तर भारतातील अनेक कंपन्यांचे मूल्यांकन (वॅल्यूएशन) आकर्षक दिसत आहे. चीनी गुंतवणूकदारांची पेमेंट्स (पेटीएम), मोबिलिटी (ओला), ईकॉमर्स सेक्टर, रिन्यूएबल ऊर्जा, फार्मास्युटिकल्स, मॅन्युफॅक्चरिंग ते इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन अशा क्षेत्रात रुची वाढली आहे.

कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक ?

बिग बास्केटमध्ये अलिबाबाची सुमारे 25 कोटी डॉलरची गुंतवणूक आहे. बायजूमध्ये टेसेंट होल्डिंग्सने 5 कोटी डॉलर, डेल्हिव्हरीमध्ये फोसूनचे 25 कोटी डॉलर, ड्रीम 11 मध्ये स्टेडव्ह्यू कॅपिटल आणि टेंसेंटने 15 कोटी डॉलर, हाइकमध्ये टेंसेंट आणि फॉक्सवॅगनने 15 कोटी डॉलर, एएनआय टेक्नोलॉजीज (ओला) मध्ये चीनच्या कंपनीने 50 कोटी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.

याव्यतिरिक्त पेटीएम मॉलमध्ये अलीबाबा ग्रुपचे 15 कोटी डॉलर, तर पेटीएममध्ये 40 कोटी डॉलरची गुंतवणूक आहे. ओयोमध्ये चीनच्या कंपन्यांनी 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय झोमॅटोमध्ये अलीबाबा आणि श्युनेवेईची 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांमध्ये चीनच्या कंपन्यांनी गुंतणूक केलेली आहे.

कर्ज देण्यास तयार चीनी बँका –

चीनच्या बँका भारतातील मोठ्या कंपन्यांना कर्ज देण्यास तयार आहेत. इंडस्ट्रियल अँड कमर्शल बँक ऑफ चायनाचे ऑफिस मुंबईत आहे. या बँकेने आपल्या टीमचा आकार देखील वाढवला आहे.

भारतीय कंपन्यांमध्ये स्टेक घेणे सोपे ?

निपॉन लाइफ इंडिया एएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिक्का म्हणाले की, भारतातील इक्विटी आणि कर्ज बाजार अत्यंत नियंत्रणात आहे आणि कोणत्याही एफपीआयला छुप्या पद्धतीने भारतीय कंपनीत मोठा हिस्सा घेणे अशक्य आहे.

Leave a Comment