किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक; अमेरिकेन माध्यमांचा दावा

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनची सर्जरीनंतर प्रकृती चिंताजनक असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. किम जोंग हे 15 एप्रिलला आपल्या आजोबांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात देखील सहभागी झाले नव्हते. यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

किम जोंग चार दिवसांपुर्वी एका सरकारी बैठकीत दिसले होते. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, किम जोंग यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्याच्या गंभीरतेविषयी सांगणे कठीण आहे. ते ब्रेडडेड झाल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. 12 एप्रिलला किम यांच्यावर ह्रदय आणि रक्तवाहिकेसंबंधी सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांच्या पकृती चिंताजनक आहे.

किम जोंग हे धुम्रपान करायचे व त्यांना लठ्ठपणाचे देखील त्रास होता. त्यांच्यावर ह्यानसांग काउंटी येथे उपचार सुरू आहेत.

उत्तर कोरियातील माध्यमांकडे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे ते सरकारला हवे तेच छापतात. किम 11 एप्रिलला शेवटचे माध्यमांसमोर आले होते.  दक्षिण कोरिया देखील अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या बातम्यांची पडताळणी करत आहे.

Leave a Comment