सॅमसंग आणणार मनुष्याच्या डोळ्यांपेक्षा अधिक चांगला कॅमेरा सेंसर

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने मागील वर्षी 64 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर लाँच केले होते. त्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी ए20 अल्ट्रामध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा दिला होता. मात्र आता सॅमसंग याच्याही पुढची झेप घेण्याची तयारी करत असून, सॅमसंगचे लक्ष्य 600 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर आणण्याचे आहे.

सेंसर बिझनेस टीमचे प्रमुख आणि ईव्हीपी योंगिन पार्क हे एका लेखात म्हणाले की, मनुष्याच्या डोळ्यांचे रिझॉल्यूशन जवळपास 500 मेगापिक्सल असते. याच्या तुलनेत सध्याच्या डीएसएलआर कॅमेरा आणि स्मार्टफोनमध्ये 40 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सल सेंसर्स मिळत आहेत. कॅमेरा इंडस्ट्रीला मनुष्याच्या डोळ्यांशी बरोबरी करण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. सॅमसंग 600 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर्स तयार करण्याची योजना बनवत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

पार्क यांनी आपल्या लेखात लिहिले की, रिझॉल्यूशन आणि पिक्सल साइजमध्ये संतूलन साधणे अवघड आहे. कमी पिक्सल फोटोची गुणवत्ता कमी करते. सॅमसंग आधुनिक पिक्सल बायनिंग टेक्नोलॉजी तयार करत आहे.

पार्क यांच्यानुसार, 64 मेगापिक्सल हे  2×2 पिक्सल बाइनिंग आणि 108 मेगापिक्सल सेंसर 3×3 पिक्सल बाइनिंग टेक्नॉलाजी अधिक लाईट आणि कमी लाईट असताना वापरले जाते.

सध्या उपलब्ध असलेले कॅमेरे मनुष्याच्या डोळ्यांना दिसणारेच फोटो (450nm and 750nm मधील वेवलेंथ) काढू शकतात आणि सेंसर जे सीमेच्या बाहेरील लाईटची वेवलेंथचा शोध घेऊ शकते. जे इमेज सेंसर उल्ट्राव्हायलेट लाईट्स आणि इनफ्रेरेड वेव्स अनभवू शकते, त्याचा वापर शेती आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील करता येईल. अल्ट्राव्हायलेट लाईटसोबत इमेज सेंसरद्वारे स्कीन कॅन्सरचा उपचार देखील शक्य होईल.

सॅमसंग ज्या 600 मेगापिक्सल कॅमेरा सेंसरवर काम करत आहे, तो स्मार्टफोनमध्ये वापरण्याची शक्यता कमी आहे. याचा उपयोग स्मार्ट कार्स, ड्रोन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ससाठी केला जाऊ शकतो.

Leave a Comment