जिओचा धमाकेदार प्लॅन, 360 दिवसांसाठी देत आहे 350 जीबी डेटा

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स लाँच करत असते. इतर प्रती स्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या प्लॅन्स स्वस्त असतात. सध्या जिओ आपल्या ग्राहकांना दिवसाला 1 जीबी, 1.5 जीबी, 2 जीबी आणि 2 जीबी डेटा पॅक्स देत आहे. मात्र कंपनीकडे एकवर्षाची वैधता असणारा प्लॅन देखील आहे.

जिओच्या एका प्लॅनची वैधता 360 दिवस म्हणजे 1 वर्ष आहे.  या प्लॅनची किंमत 4,999 रुपये असून, या प्रीपेड पॅकमध्ये ग्राहकांना 350 जीबी डेटा मिळतो.

याव्यतिरिक्त ग्राहकांना जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि दुसऱ्या नेटवर्क कॉल करण्यासाठी दर महिन्याला 1 हजार मिनिटे असे एकूण 12 हजार मिनिटे मिळतात. दिवसाला 100 एसएमएम आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत स्बस्क्रिप्शन देखील मिळेल.

जर एका दिर्घ कालावधीचा प्लॅन घेतल्यास वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. हा रिचार्ज प्लॅन 1 वर्ष चालेल.

Leave a Comment