फेसबुककडून होत आहे तुमची टेहाळणी, अशी बदला सेटिंग्स

फेसबुक कँब्रिज एनालिटिका डाटा लीकनंतर फेसबुक युजर्सच्या गोपनीयता आणि प्रायव्हेसीवर वारंवार प्रश्न निर्माण झाले आहेत. कँब्रिज एनालिटिका प्रकरणात फेसबुक माफा मागावी लागली होती व दंड देखील भरावा लागला होता. फेसबुकवर युजर्सचा डेटा थर्ड पार्टीला विकण्याचा आरोप वारंवार झाला आहे.

तुम्ही अन्य वेबसाईटवर काय काय करता याची देखील माहिती फेसबुकला मिळत असते.

युजर्सची होत आहे ट्रॅकिंग –

याआधी देखील फेसबुकवर आरोप करण्यात आला होता की फेसबुक न वापरणाऱ्यांचा डेटा देखील कंपनीकडे आहे. फेसबुक हा डेटा अन्य वेबसाईट्समध्ये असलेले फेसबुकच्या प्लगइनद्वारे जमा करते. मात्र आता तुम्ही कोणत्या वेबसाईटवर जाता आणि काय सर्च करता याची देखील माहिती फेसबुककडे आहे.

तुम्ही ज्या ज्या वेबसाईटवर जाता त्या वेबसाईट तुमची माहिती फेसबुकला देत असतात.

अशी मिळवा ट्रॅकिंगची माहिती –

यासाठी फेसबुकच्या सेटिंग्समध्ये More Options पर्याय निवडा. त्यानंतर मॅनेज फ्युचर एक्टिव्हिटीवर क्लिक करून बंद करा. यानंतर हिस्ट्री क्लिअर करा. हिस्ट्री डिलीट केल्यानंतर तुमचा पुर्ण डेटा डिलीट होईल.

मॅनेज फ्यूचर एक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सर्च केलेल्या सर्व वेबसाईट्सची यादी तुम्हाला मिळेल. या डेटाचा उपयोग जाहिरातींसाठी केला जातो. याच्या आधारावरच युजर्सला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती दिसत असतात.

Leave a Comment