सचिन-द्रविडशी विराट-रोहितची तुलना होऊच शकत नाही – मोहम्मद युसूफ

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मोहम्मद युसूफनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा कितीही चांगले फलंदाज असले तरी त्यांची तुलना सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड सोबत होणे शक्य नाही.

मोहम्मद युसूफचे म्हणणे आहे की, सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविडचा एक वेगळाच दर्जा होता. सचिन आणि द्रविडच्या दर्जासोबत कोहली आणि रोहितची तुलना होऊ शकत नाही.

युसूफ म्हणाला की, सध्याच्या भारतीय क्रिकेट संघात सचिन आणि द्रविड सारखे खेळाडू नाही. तुम्ही कोहली-रोहितला सचिन-द्रविडच्या क्लासमध्ये ठेऊ शकत नाही.

युसूफ म्हणाला की, भारतीय संघाच्या बॅटिंग लाईनअपमध्ये सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि युवराज सिंह सारखे फलंदाज होते. सध्याच्या भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूची तुलना या दिग्गजांसोबत करता येणार नाही.

मोहम्मह युसूफ बाबर आजम आणि विराट कोहलीच्या तुलनेवर म्हणाला की, सध्या विराट कोहली जगातील क्रमांक 1 चा फलंदाज आहे. मात्र बाबर ज्या पद्धतीने खेळत आहे, निश्चितच एकेदिवशी तो जगातील सर्वोत्तम फलंदाज बनू शकतो.

Leave a Comment