हुकुमशहा किम जोंगच्या पत्नीला पाळावे लागतात हे कठोर नियम

एखाद्या देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या पत्नीला सार्वजनिक आयुष्यात अनेक नियम पाळावे लागत असतात. देशाचे प्रमुख असलेल्या या व्यक्तींच्या पत्नीसाठी अनेक कठोर नियम असतात. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची पत्नी री सोल जू यांना देखील विशेष नियमांचे पालन करावे लागते. उत्तर कोरियाच्या प्रथम महिला असलेल्या री यांच्यासाठी असलेल्या विचित्र नियमांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – navbharattimes

प्रवास करण्यास परवानगी नाही –

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, री सोल जू यांनी आपल्या ईच्छेने कोठेही जाण्यास परवानगी नाही. त्यांचा स्वतःचा अधिकृत प्रवास देखील नसतो. त्यांना नेहमीच पती किम जोंग उन यांच्यासोबतच पाहण्यात आले आहे. त्या कोठे जाणार हे देखील आधीच निश्चित असते. किम जोंग यांच्यासोबत कार्यक्रमात री सोल जू सहभागी होणार असल्यास किम यांच्या कपडे देखील स्टायलिश असतात.

Image Credited – navbharattimes

प्रेग्नेंसी लपवणे –

सांगण्यात येते की री सोल जू यांना 3 मुले आहेत. मात्र याबाबत अधिकृत माहिती कधीच देण्यात आलेली नाही. प्रेग्नेंसी दाखवण्याची देखील परवानगी नाही. अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रमात देखील सहभागी होऊ दिले जात नाही. कार्यक्रमात सहभागी झाल्यास असे कपडे घातले जातात, ज्यामुळे पोट दिसणार नाही.

Image Credited – navbharattimes

फोटोवर विशेष लक्ष –

पत्नीचे फोटो काढणे अथवा इतर कव्हरेजवर किम जोंग यांचे कठोर नियम आहेत. किम परवानगी देत नाही तोपर्यंत री यांच्याबाबत काहीही लिहिले जात नाही व त्यांचा फोटो देखील काढला जात नाही. इंटरनेटवर त्यांचे फोटो विना परवानगी पब्लिश करता येत नाही.

Image Credited – navbharattimes

जीन्स अथवा स्टायलिश टॉप घालण्यास परवानगी नाही –

उत्तर कोरियात घट्ट जीन्स अथवा स्लिवलेस टॉप घालण्यास महिलांना परवानगी नाही. प्रथम महिला असल्याने री सोलू जू यांच्यासाठी देखील हे नियम आहेत. सार्वजनिक ठिकाणी त्या अनेकदा फॉर्मल स्टाइल स्कर्ट, टॉप आणि जॅकेटमध्येच दिसतात.

Image Credited – navbharattimes

मुलांबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही –

कितीवेळा आई बनणार याचा निर्णय घेण्याची री सोलू जू यांना परवानगी नाही. मुलांसंबधी निर्णय देखील किम जोंग उनच घेतात. रिपोर्टनुसार, री यांना आधी दोन मुली आहे. मात्र किम यांना शासन करण्यासाठी मुलगा हवा होता. त्यामुळे री यांच्यावर त्यांनी दबाव टाकला.

Image Credited – navbharattimes

कुटुंबाला भेटण्याची परवानगी नाही –

री यांना आपल्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी नाही. लग्नानंतर खूप कमी वेळा री यांना कुटुंबीयाची भेट घेतली आहे. किम जोंग उन यांच्या गोष्टी बाहेर जाऊ नयेत, यासाठी हे कठोर नियम असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment