फेसबुकने लाँच केले खास ‘गेमिंग’ अ‍ॅप

लॉकडाऊनमुळे ऑनलाईन गेमिंग आणि व्हिडीओ स्ट्रिमिंग पाहणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच पार्श्वभुमीवर आता सोशल मीडिया कंपनी फेसबुकने युजर्ससाठी एक खास गेमिंग अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपला फेसबुकने फेसबुक : गेमिंग वॉच, प्ले अँड कनेक्ट नाव दिले आहे.

या अ‍ॅपचे खास वैशिष्ट्य म्हणजे या गेमिंग अ‍ॅपला विना डाऊनलोड करता खेळता येते. गुगल प्ले स्टोरवरून हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येईल.

या अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची गेम खेळ्यासोबतच तुमच्या आवड्या गेमिंग ग्रुपला ज्वाइन देखील होऊ शकता. या अ‍ॅपवर तुम्हाला गेम पब्लिशर्स आणि गेम स्टिमर्सचे व्हिडीओ देखील पाहण्यास मिळतील. गेमिंग दरम्यान तुम्ही मित्राशी चॅटिंग देखील करू शकतात.

फेसबुकचे हे गेमिंग अ‍ॅप जूनमध्ये लाँच होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे कंपनीने अ‍ॅपला एप्रिलमध्येच लाँच केले आहे.

Leave a Comment