जाणून घ्या आंबे खाण्याचे काय आहेत फायदे

उन्हाळा आला की फळांचा राजा असलेल्या आंब्याचे देखील आगमन होते. आंबा आवडत नसेल असा व्यक्ती क्वचितच शोधून सापडेल. केवळ स्वाद म्हणूनच नाहीतर आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. या फायद्यांविषयी जाणून घेऊया.

व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स –

आंब्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे रोगांचा सामना करण्याची शक्ती वाढते.

व्हिटॅमिन ए –

आंब्यात व्हिटॅमिन ए सह बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-क्रिप्टोक्झॅन्थिन सारख्या फ्लॅवोनाईड्सचे देखील प्रमाण अधिक असते. हे फळ नियमित खाल्ल्याने डोळे देखील चांगले राहतात.

पोटॅशियम –

ताजे आंबे हे पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहेत. त्यामुळे हार्टरेट आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

फायबर –

आंब्यात मोठ्या प्रमाणात फायबर आणि पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे पचनक्रियेसाठी हे फायदेशीर ठरते.

आंबे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र यासंबंधी अनेक अफवा देखील पसरवल्या जातात. आंबा खाल्ल्याने वजन वाढते, असे सांगितले जाते. मात्र असे काहीही नाही. इतर फळांप्रमाणेच आंब्यात देखील पोषकतत्वे, फायबर, अँटिऑक्सिडेंट आणि खनिजे असतात. योग्यरित्या हे फळ खाल्यास वजन वाढत नाही.

मधमेह असलेले करू शकतात आंब्याचे सेवन –

मधुमेह असलेले व्यक्ती देखील आंब्याचे सेवन करू शकतात, मात्र त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. तज्ञांकडून सल्ला घेऊनच सेवन करावे.

आंबा हा त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरतो. उन्हाळ्यात शरीरात हायपरअ‍ॅसिड तयार होते, अशा स्थितीत आंबा खाल्ल्याने शरीरावर पुरळ येऊ शकते. त्यामुळे आंबा खाण्यापुर्वी काही मिनिटे पाण्यात भिजवावा.

आंबा खाण्याची योग्य पद्धत –

आंबा हा दुपारी अथवा रात्री मुख्य जेवणासोबत खाऊ नये. त्याऐवजी सकाळी अथवा संध्याकाळी स्नॅक म्हणून तुम्ही आंब्याचे सेवन करू शकतात. यामुळे वजन वाढण्याची चिंता राहणार नाही. तुम्ही पुर्ण आंबा सालीसकट खाऊ शकता. मात्र ज्यूस करणे टाळावे, अन्यथा त्यातील फायबर आणि पोषकतत्वे निघून जातात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment