अमेरिकेचा मोठा निर्णय, बंद करणार इमिग्रेशन सेवा; हजारो भारतीयांना बसणार फटका

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. यामुळे अमेरिकेत लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत इमिग्रेशन तात्पुरते बंद करणार असल्याचे सांगितले आहे.

परदेशातून अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी इमिग्रेशन सेवा तात्पुरती बंद करण्यात येणार असून, याच्या आदेशावर सही करणार असल्याची ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अदृश्य शत्रूचा हल्ला, अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी हे गरजेचे असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

दरवर्षी 1.1 मिलियन परदेशी नागरिक कायदेशीररित्या अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी येतात. कोणत्याही देशापेक्षा ही सर्वाधिक संख्या आहे. यातील 6 लाख नवीन परदेशी नागरिक असतात, तर 5 लाख देशातच वास्तव्यास असलेले नागरिक अर्ज करतात.

मात्र ट्रम्प यांच्या ट्विटवरून हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचे दिसत आहे. असे असले तरी विरोधक मात्र त्यांच्या या निर्णयावर टीका करत आहेत.

Leave a Comment