शांत झोपेसाठी या गोष्टींचा करा आहारात समावेश

शांत व पुरेशी झोप न मिळाल्याने अनेकदा चिडचिड होत असते. आज कामाचा तणाव, अभ्यास अशा अनेक गोष्टींमुळे शांत झोप मिळत नाही. जगभरात 13 मार्चला वर्ल्ड स्लीप डे साजरा करण्यात आला. या वर्षीचे स्लीप डे चे स्लोगन ‘बेटर स्लीप, बेटर लाइफ, बेटर प्लेनेट’ (better sleep, better life, better planet)  असे होते. जर तुम्हाला देखील शांत झोप लागत नसेल, तर काही गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. ज्याद्वारे तुम्ही अगदी निंवात झोपू शकाल.

Image Credited – Navbharattimes

बदाम –

रात्री शांत झोपेसाठी बदाम महत्त्वाचे आहे. झोपण्या आधी तुम्ही 2 बदाम खाल्ले तर याद्वारे तुम्हाला अगदी शांत झोप लागेल. बदामामध्ये हार्मोन मेलाटोनिन असते, यामुळे नियमित झोप लागते.

Image Credited – Navbharattimes

किवी –

किवी फळाचे अनेक फायदे आहेत. सर्वसाधारणपणे डेंग्यू झालेल्या रुग्णाला हे फळ खाण्यास सांगितले जाते. किवीचे सेव झोपेची गुणवत्ता देखील वाढवते. रात्री झोपण्याधी किवीचे सेवन नक्की करा.

Image Credited – Navbharattimes

अक्रोड –

अक्रोड देखील शांत झोपण्यास फायदेशीर आहे. यातील मेलाटोनिन हार्मोनमुळे रात्री शांत झोप लागते.

Image Credited – Navbharattimes

कॅमोमाईल चहा  –

रात्री झोपण्याआधी जर तुम्ही कॅमोमाईल चहा घेतला तर तुम्हाला चांगली झोप लागेल. या चहामध्ये तणाव दूर करण्याचा गुण आहे. त्यामुळे झोपण्याच्या अर्धा तास आधी या चहाचे सेवन तुम्हाला नक्कीच चांगली झोप देईल.

Image Credited – Navbharattimes

केळी आणि दूध –

केळ आणि दूधाचे सेवन देखील शांत झोपेसाठी फायदेशीर आहे. केळ अथवा दूधापैकी एकाच गोष्टीचे सेवन करावे. या दोन्हीमध्ये ट्रायटोफन असते, जे शांत झोपेसाठी फायदेशीर ठरते.

Image Credited – Navbharattimes

पांढरा भात –

रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश नक्की करा. यामुळे तुम्हाला बेडवर पडल्या पडल्या झोप लागेल. भातात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे झोप चांगली येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment