लॉकडाऊन मध्ये स्पायडरमॅन सक्रीय


फोटो साभार नवभारत टाईम्स
जगाला व्यापून राहिलेल्या करोना संकटात माणसे एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत आणि त्याच्या रोज नव्या कथा सोशल मिडियावर व्हीडोओ, फोटोच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. मोठ्या प्रमाणावर अश्या बातम्या शेअर केल्या जात आहेत. सोशल मिडियावर येत असलेल्या फोटोत एक वेगळा फोटो करोना संकटाने ग्रासलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर नकळत हास्य फुलवित आहे. हा फोटो वृद्ध लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरपोच जीवनावश्यक वस्तू पोहोचविणाऱ्या एका व्यक्तीचाच आहे फक्त ही व्यक्ती स्पायडरमॅनच्या कॉस्च्युम मध्ये आहे.

बुराक सोयालू (BURAK SOYLU) असे या व्यक्तीचे नाव असून तो तुर्कस्तानचा आहे. तुर्कस्तान मध्येही सध्या कोविड १९ मुळे लॉक डाऊन आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यात अडचणी आहेतच पण वृद्ध लोकांना घराबाहेर पडून दुध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू आणणे कठीण जात आहे. त्यांना बुराक स्वेच्छेने मदत करत आहे. तो स्पायडरमॅनच्या वेशात त्याच्या बीटल कार मधून फिरतो, भाजीपाला, दुध अश्या वस्तू खरेदी करतो आणि गरजू वृद्ध लोकांना वाटतो. तो म्हणतो माझ्यातील सुपरपॉवरचा असा उपयोग शेजाऱ्यांना होत असेल तर ते चांगलेच आहे.

गुडेबल ने या स्पायडरमॅनची कथा सोशल मिडियाच्या माध्यमातून जगाबरोबर शेअर केली असून त्याला काही अवधीत १० हजाराहून अधिक लाईक्स आणि ३ हजाराहून अधिक रीट्विट मिळाले आहेत.

Leave a Comment