मराठमोळी रिंकू करतेय डिजिटल डेब्यू


फोटो साभार जागरण
आपल्या पहिल्या वाहिल्याच चित्रपटाने, ‘सैराट’ मुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर प्रसिद्धीच्या झोतात आलेली मराठमोळी रिंकू राजगुरू आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत आहे. प्रसिद्ध डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारच्या स्पेशल सिरीज ‘हंड्रेड’ मध्ये रिंकू महत्वाची भूमिका साकारत असून त्याचा ट्रेलर आज म्हणजे मंगळवारी रिलीज होत आहे.

रिंकूच्या गाजलेल्या सैराटचा हिंदी रिमेक करण जोहर याने बनविला होता आणि त्यात अर्चीची भूमिका जान्हवी कपूरने केली होती. रिंकू सांगते, हॉटस्टारवर येत असलेली ‘हंड्रेड’ ही अॅक्शन कॉमेडी असून त्यात रिंकू नेत्रा पाटील नावाचे पात्र साकारत आहे. तिची ही पहिलीच डिजिटल सिरीयल आहे आणि त्यात काम करण्याचा अनुभव चांगला होता. सध्या हे माध्यम मनोरंजनाचे मोठे साधन बनल्याचेही रिंकू सांगते.

याच सिरीयल मध्ये बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्त सुद्धा महत्वाच्या भूमिकेत असून ती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अधिकारी अश्या भूमिकेत आहे. लाराची सुद्धा ही पहिलीच डिजिटल सिरीयल आहे. ही मालिका ९ भागांची आहे.

Leave a Comment