चीनमधून काढता पाय, १ हजार परदेशी कंपन्या भारताच्या वाटेवर


फोटो साभार बिझिनेस टुडे
जगातील बहुतेक सर्व क्षेत्रातील कंपन्याचे आवडते उत्पादन केंद्र अशी ओळख मिळविलेल्या चीनची ही ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. कोविड १९ महामारीचा चीन मधून जगभर झालेला प्रसार आणि त्यामुळे जगावर आलेले आर्थिक मंदीचे संकट यामुळे ही वेळ ओढवली असल्याचे समजते. विशेष म्हणजे चीन मधील सुमारे १ हजार परदेशी कंपन्या त्यांची उत्पादन केंद्रे चीन मधून हलवून भारतात आणण्यासाठी उत्सुक असून केंद्र सरकार बरोबर त्या संदर्भात बोलणी करत आहेत असे बिझिनेस टुडे च्या अहवालात म्हटले गेले आहे.

या एक हजार कंपन्या मधील किमान ३०० कंपन्या मोबाईल, इलेक्ट्रॉनिक, मेडिकल डिव्हायसेस, टेक्स्टाईल, सिंथेटिक फॅब्रिक या क्षेत्रातल्या असून भारत सरकारबरोबरची त्यांची बोलणी यशस्वी ठरली तर चीनसाठी तो मोठा फटाका ठरणार आहे. चीन मधून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या बहुतेक कंपन्यांनी भारत सरकारपुढे प्रस्ताव सादर केले असून विविध पातळ्यांवर बोलणी सुरु आहेत. पैकी ३०० कंपन्यांवर भारताने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. देशातील कोविड १९ साथीवर नियंत्रण आल्यानंतर त्या संदर्भातील बोलणी पुढे सरकतील असे समजते.

केंद्र सरकारने गेल्या सप्टेंबरमध्येच मोठा निर्णय घेऊन कार्पोरेट टॅक्स कमी करून २७.१७ वर आणला आहे आणि नवीन कंपन्यांना तो १७ टक्केच आकाराला जाणार आहे. दक्षिण पूर्व आशियात कराचा हा दर सर्वात कमी आहे. देशभर जीएसटी लागू असल्याने उत्पादन कंपन्या गुतंवणूक करण्यास पसंती देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment