युट्यूबमधील व्ह्यूजची संख्या आता मिलियन ऐवजी लाखात दिसणार

लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने आपल्या अँड्राईड अ‍ॅपमध्ये मोठा बदल केला आहे. भारतीय युजर्सला आकर्षित करण्यासाठी आता युट्यूबने व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या मिलियन आणि बिलियनच्या जागी लाख आणि कोटीमध्ये दाखविण्यास सुरूवात केली आहे.

मात्र मिलियन आणि बिलियनची सवय झालेल्या भारतीयांना हा नवीन बदल फारसा आवडलेला नाही.

युट्यूबचे जगभरात जवळपास 200 कोटी युजर्स आहेत. त्यातील जवळपास 26 कोटी 50 लाख युजर्स भारतातच आहेत. त्यामुळे भारतीय युजर्सला आकर्षित करण्यासाठी युट्यूबने हा बदल केला आहे. मात्र हा बदल अद्याप सर्व भारतीयांना दिसू लागलेला नाही. युट्यूबने मर्यादित युजर्सवर हा प्रयोग केला आहे.

या प्रयोगांतर्गत कोणताही व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या, युट्यूब चॅनेलच्या स्बस्क्रायबर्सची संख्या आता मिलियन किंवा बिलियनच्या जागी लाख आणि कोटीमध्ये दिसणार नाही. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्व प्लॅटफॉर्मसाठी लागू केला जाईल.

सोशल मीडिया युजर्सचा या बदल झालेल्या फीचरचे स्क्रीनशॉट शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment