उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडीलांचे निधन


नवी दिल्ली : सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन झाले असून ते 89 वर्षांचे होते. सोमवारी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांनी अखेरचा श्वास घेतला. लिवर आणि किडनीची आनंद सिंह बिष्ट यांना समस्या होती. त्यांची तब्येत गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांचे आज निधन झाले.

त्यांच्यावर मंगळवारी हरिद्वारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे आज सकाळी 10.44 वाजता निधन झाले असल्याचे सांगत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश के. अवस्थी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांनीदेखील योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

Leave a Comment