विजय माल्ल्याचा खेळ खल्लास! आता भारतात परतावेच लागणार


नवी दिल्ली : भारतीय बँकांना हजारो कोटींचा चूना लावून फरार झालेला उद्योगपती विजय माल्ल्याला आता भारतात परतण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भारतात परतल्यानंतर अटक होण्याच्या भितीने देशाबाहेर लपून बसलेल्या माल्ल्याने स्वतःच्या प्रत्यार्पणाविरोधात दावा दाखल केला होता. पण त्याचा हा दावा फेटाळण्यात आला असून त्याला आता प्रत्यार्पण करावेच लागणार आहे.

माल्ल्यावर तब्बल 9000 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. गेले काही महिन्यांपासून तो ब्रिटनच्या आश्रयाला आहे. पण भारताने विजय माल्ल्याचे प्रत्यार्पण करावे, असे सांगितल्यानंतर ब्रिटनच्या कोर्टात याविरोधात त्याने याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर लंडनच्या कोर्टाने आज निकाल दिला. या निकालानुसार माल्ल्याची याचिका फेटाळण्यात आल्यामुळे माल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

भारतातून फरार घोषित करण्यात आलेल्या किंगफिशरचा मालक विजय माल्ल्याने पुन्हा एकदा 100 टक्के कर्जाची परतफेड करण्याची भाषा केली आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीबाबत ट्विट करत त्याने, हे वक्तव्य केले आहे. ट्विटरवर विजय माल्ल्याने लिहिले आहे की, भारत सरकार आणि ईडी त्याला सहकार्य करत नाही.

Leave a Comment