रामायणातील क्लायमॅक्समध्ये छेडछाड, चाहते निराश

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांसाठी सरकारने दुरदर्शनवर रामायण मालिका दाखविण्यास सुरूवात केली. लोक देखील उत्सुकतेने ही मालिका बघत असून, मालिकेने अनेक विक्रम देखील केले आहेत.

सध्या मालिकेत रावणाचा वध झाला असून, राम-सीता-लक्ष्मण अयोध्येला परत आले आहेत. मात्र कार्यक्रमाचे क्लायमॅक्स बघूल लोकांची निराशा झाली आहे. क्लायमॅक्सच्यी सीनला अर्धवटच एडिटकरून दाखवल्याने कार्यक्रमाच्या प्रोड्यूसर्सला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

लोकांचे म्हणणे आहे की रावण वधाच्या वेळेस अनेक दृश्य कापण्यात आली. राम आणि रावण यांच्या युद्धातील अनेक महत्त्वाची दृश्य कापल्याने चाहते निराश झाले आहेत. याशिवाय लक्ष्मण आणि उर्मिला यांच्या भेटीचा क्षण देखील दाखवला नसल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.

युजर्सनी लिहिले की, रामायणामधील अनेक दृश्य कापल्याने खूप निराश आहे. तर दुसऱ्या एका युजरने ट्विटरवर लिहिले की, भगवान हनुमान छाती फाडून सिया-राम यांची प्रतिमा दाखवतात, ते दृश्य देखील गायब आहे.

युजर्सनी अशा अनेक महत्त्वाच्या दृश्यांचा उल्लेख केला, जी कापण्यात आली आहे. यामुळे लोक खूपच निराश झाले. दरम्यान, कार्यक्रमात सध्या उत्तर रामायणाची सुरूवात झाली असून, लवकरच लव-कुश हे कार्यक्रमात दिसतील.

Leave a Comment