खुशखबर ! वनप्लस 8 झाला हजारो रुपये कमी किंमतीने भारतात लाँच

स्मार्टफोन कंपनी वनप्लसने काही दिवसांपुर्वीच आपले दोन नवीन स्मार्टफोन वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो लाँच केले होते. आता या स्मार्टफोनच्या भारतातील किंमतींचा खुलासा झाला आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारतातील या स्मार्टफोनची किंमत हजारो रुपयांनी कमी आहे.

भारतात वनप्लस 8 च्या 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये, 8 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. मात्र अमेरिकेत 8 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत जवळपास 53 हजार रुपये आणि 12 जीबी व्हेरिएंटची किंमत जवळपास 61 हजार रुपये आहे.

तर भारतात वनप्लस 8 प्रोच्या 8 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे. मात्र अमेरिकेत या व्हेरिएंटची किंमत 69 हजार रुपये आहे.  12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची भारतीय किंमत 59,999 रुपये आहे, तर अमेरिकेत या व्हेरिएंटची किंमत जवळपास 75,000 रुपये आहे. त्यामुळे भारतीयांना अमेरिकेच्या तुलने वनप्लस 8 सीरिजमधील स्मार्टफोन तब्बल 14 ते 15 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

याशिवाय वनप्लस बुलेट्स वायरलेस एअरबड्स देखील 1,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. अमेरिकेत या एअरबड्सची किंमत जवळपास 3,800 रुपये आहे.

लॉकडाऊननंतर मे महिन्यात या फोनची विक्री सुरू होणार आहे. युजर्स अ‍ॅमेझॉनवर या फोनच्या विक्री आणि डिलिव्हरीची माहिती मिळवू शकतात.

Image Credited – indiatoday

वनप्लस 8 स्पेसिफिकेशन –

वनप्लस 8 मध्ये 6.55 इंच फूल एचडी+ डिस्प्ले मिळेल, ज्याचा 90Hz रिफ्रेश रेट आहे. कंपनीचा दावा आहे की डिस्प्लेला ए+ रेटिंग मिळाले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर मिळेल. शिवाय यात 5जी कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे.

वनप्लस 8 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील 48 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा, 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा मिळेल. सोबतच 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.

Image Credited – news18

हा फोन ओनिक्स ब्लॅक, ग्लेशियल ग्रीन आणि इंटरस्टेलर ग्लो या तीन रंगात उपलब्ध असून, फोनमध्ये 4300mAh बॅटरी देण्यात आलेली आहे.

Image Credited – indiatoday

वनप्लस 8 प्रो स्पेसिफिकेशन –

वनप्लस 8 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचचा क्वाडएचडीफ्लूइड डिस्प्ले मिळेल. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेमेटकडून डिव्हाईसला ए+ रेटिंग मिळाली आहे.

फोनमध्ये क्वॉड-कोर कॅमेरा देण्यात आला असून, याचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. जो सोनी सेंसर आहे. दुसरा 120 डिग्री फिल्ड व्ह्यूसह 48 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड लेंस, तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल टेलिफोटो लेंस आणि चौथा कॅमेरा 5 मेगापिक्सल कलर फिल्टर आहे. सोबतच सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

Image Credited – NDTV

या स्मार्टफोनमध्ये 4510mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी वायरलेस वार्प चार्ज 30 चार्जिंगसोबत येते. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन X55 5जी मोडेम-आरएफ सिस्टम मिळेल. याशिवाय यात कनेक्टिव्हिटीसाठी 5जी आणि वाय-फाय 6 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment