लॉकडाऊन : विना स्विमिंग पूलची अशी पोहत आहे ही ऑलिम्पिक विजेती जलतरणपटू

लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद असून, लोक घरात कैद आहेत. खेळाडू सराव करायला जावू शकत नाही. जिम देखील घरातच करत आहे. अशातच रशियाची जलतरणपटू यूलिया एफिमोव्हाने स्विमिंग पूल शिवाय घरातच पोहण्याचा उपाय शोधून काढला आहे.

सोशल मीडिया यूलियाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती घरातच विना स्विमिंग पूल पोहताना दिसत आहे. तिने एका डेस्कवर पाय ठेवले आहे व अर्धे शरीर पुढे मोकळे सोडले आहे. मागून तिचे पाय एका व्यक्तीने पडकले असून, आपले शरीर उचलत ती हवेत पोहण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हिडीओमध्ये ती उलटे होऊन देखील पोहताना दिसत आहे. याशिवाय ती व्यायाम करताना देखील दिसत आहे.

यूलियाने रियो ऑलिम्पिकमध्ये दोन रौप्य पदक आपल्या नावावर केली होती. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर यूलियाचे विना स्विमिंग पूलचे पोहतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत लाखो युजर्सनी हे व्हिडीओ पाहिले आहेत.

Leave a Comment