थॅनॉसने का मागितली माफी ?

लॉकडाऊनमुळे सर्वचजण आपआपल्या घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना भेटणे अवघड झाले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच मित्रांशी संवाद साधवा लागत आहे. मात्र सेल्फ क्वारंटाईनचे पालन न करत आपल्या पालकांना भेटायला गेल्याने अभिनेता जोश ब्रोलिनला टीकेचा सामना करावा लागत आहे.

50 वर्षीय जोश ब्रोलिनने एव्हेंजर्स चित्रपटात थॅनॉसची भूमिका साकारली आहे. ब्रोलिने सेल्फ क्वांरटाईन मोड आपली पत्नी कॅथेरियन आणि 1 वर्षांची मुलगी वेस्टलियनला घेऊन आपल्या पालकांचे घरी गेला होता. सर्वांचा फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला. मात्र क्वांरटाईन मोडल्याने नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर डिलीट करण्यात आला आहे.

Image Credited – storypick

मात्र या प्रकरणार ब्रोलिनने माफी मागितली आहे. तो म्हणाला की, वडील हे आमच्या घरा शेजारीच राहतात. आमची त्यांना बघायला जाण्याची योजना होती, ना की त्यांच्या जवळ जाण्याची. मात्र ही योजना यशस्वी झाली नाही. ही नक्कीच आमची जबाबदारी आहे. आम्ही दुसरेच काहीतरी करण्यासाठी गेलो होतो. मात्र आमच्याकडे पूल नसल्याने मुलीला पूल दाखवला. माझे वागणे नक्कीच बेजबाबदारपणाचे होते.

ब्रोलिन पुढे म्हणाला की, कधीकधी प्रामाणिकपणे वागणे अवघड होते. प्रामाणिपणे मी चुकला आहे हे मान्य करणे देखील अवघड असते. आलेल्या प्रतिक्रियांनी मला पुन्हा वास्तविक परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. मला आठवण करून दिल्याबद्दल खरचं आभार. हे खरचं माझ्यासाठी गरजेचे होते आणि मी नक्कीच माझ्या माणसांची काळजी करतो. धन्यवाद.

Leave a Comment