फेसबुकवर हजारो फॉलोअर्स असणारी ‘ती’ निघाली ‘तो’, पोलिसांकडून अटक

मुलीचा फोटो वापरून बनावट फेसबुक अकाउंट चालवणाऱ्या एका व्यक्तीला छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. रवी नावाचा हा व्यक्ती निशा जिंदल नावाने बनावट फेसबुक अकाउंट चालवत होतो. विशेष म्हणजे या अकाउंटला 10 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स देखील होते.

जातीयवाचक पोस्ट केल्याने पोलीस हे अकाउंट चालवणाऱ्याचा शोध घेत होते. मात्र हे मुलीचे अकाउंट रवी नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे आढळून आले.

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील तो अशाप्रकार बनावट अकाउंट चालवत असल्याचे सांगितले जाते. रवी हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.

https://www.facebook.com/itsmenisha.jindal/posts/2055123497964116

आयएएस अधिकारी प्रियंका शुक्ला यांनी सांगितले की, जातीय वैर पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलीस निशा जिंदलला पकडण्यास गेल्यावर, हे अकाउंट रवी चालवत असल्याचे आढळले. मागील 11 वर्षांपासून तो इंजिनिअरिंग देखील पास करू शकलेला नाही. पोलिसांनी त्याला सत्य सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितले, जेणेकरून 10 हजार फॉलोअर्सला खरे समजेल.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी देखील पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले.

पोलिसांनी आयपी अ‍ॅड्रेसवरून आरोपीचा शोध घेतल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment