चोरी झालेले व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट असे करा रिकव्हर

जगभरात इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या कोटीमध्ये आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज इनक्रिप्टेड असतात आणि यात प्रायव्हेसीसाठी अनेक फीचर्स देखील आहेत. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशनची देखील सुविधा देण्यात आलेली आहे. जर तुम्ही हे व्हेरिफिकेशन कोड कोणाशी शेअर केल्यास तुमचे अकाउंट चोरीला जाऊ शकते. तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट चोरी अथवा हॅक झाल्यास परत कसे मिळवाल ? याविषयी जाणून घेऊया.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट दुसरी व्यक्ती वापरत आहे, तर मित्र व कुटुंबातील सदस्यांना याबाबत माहिती द्या. जेणेकरून तुमचे नाव वापरून चुकीच्या गोष्टी होणार नाहीत. मेसेज हे ऐंड टू ऐंड इनक्रिप्टेड असतात. त्यामुळे जुने मेसेज दुसऱ्या डिव्हाईसवर वाचू शकत नाही.

अकाउंट परत मिळविण्यासाठी  –

यासाठी तुमच्या मोबाईल नंबरद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर साइन इन करा. त्यानंतर तुम्हाला आलेला 6 डिजिट पिन टाका. हा 6 डिजिटचा एसएमएस टाकल्यानंतर इतर डिव्हाईसवर सुरू असलेले अकाउंट आपोआप डिलिट होईल.

याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन कोडबाबत विचारेल. जर तुमच्याकडे या कोडची माहिती नसेल तर कदाचित दुसऱ्या व्यक्तीने टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुर केले असेल. टू-स्टेप व्हेरिफिकेशन कोडशिवाय साइन इन करण्यासाठी तुम्हाला 7 दिवस वाट पाहावी लागेल.

जर एखादी व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप वेब अथवा डेस्कटॉपवरून तुमचे अकाउंट वापरत आहे अशी शंका असल्यास तुमच्या मोबाईलमधून त्वरित सर्व अकाउंट लॉग आउट करा.

Leave a Comment