Tom and Jerry, Popeyeचे निर्माते काळाच्या पडद्याआड


मुंबई : प्रसिद्ध कार्टून व्यक्तिरेखा असलेल्या Tom and Jerry, Popeye the sailor man कार्टून्सचे निर्माते जीन डाइच यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले आहे. आपल्या राहत्या घरात जीन डाइच 16 एप्रिल रोजी मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांपैकी एक असलेल्या पीटर हिमल यांनी 18 एप्रिल रोजी जीन डाइच यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला.

आपल्या कार्टून पात्रांनी संपूर्ण जगाला भूरळ घालणारे जीन आधी उत्तर अमेरिकेमध्ये सैन्यात कार्यरत होते. सैन्यातील पायलट्सना ट्रेनिंग देणे आणि सैन्यासाठी ड्राफ्टमॅनचे ते काम करत होते. परंतु, त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे 1944मध्ये सैन्य दलातून काढून टाकण्यात आले.

जीन डाइच यांनी सैन्यदलानंतर अॅनिमेशनमध्ये आपली पुढील कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला. जगाला त्यांनीच टॉम अॅन्ड जेरी ही हिट जोडी दिली. जीन डाइच यांनी अॅनिमेशन क्षेत्रात खूप महत्वपूर्ण काम केले पण त्यांना लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर्स टॉम अॅन्ड जेरी, पोपाय द सेलर मॅन यांच्यामुळे खरी ओळख मिळाली. त्यांना आपल्या उत्तम दिग्दर्शनासाठी चार वेळा ऑस्कर नॉमिनेशनही मिळाले आहे. त्याचबरोबर 1967मध्ये चित्रपट मुनरोसाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. जीन डाइच यांनी टॉम अॅन्ड जेरीचे एकूण 13 एपिसोड्स तयार केले होते.

Leave a Comment