रोल्स रोईसच्या मॉडेल्सना म्हणून असतात भूतांची नावे


फोटो साभार व्हील्स २४
रस्त्यावरच चालता फिरता महाल अशी ओळख मिळविणारी रोल्स रोईस जगात जितक्या म्हणून लग्झरी कार्स आहेत त्यात सर्वात पुढे म्हणावी लागेल. किंबहुना अलिशान आरामदायी कार्स म्हटल्या की रोल्स रोईसचे नाव न घेता पुढे सरकणे अशक्य असा तिचा दबदबा आहे. ही कार म्हणजे सुख सुविधांचा जणू महाल. अतिशय आरामदायी आणि जबरदस्त फिचर्सनी युक्त असलेल्या या कार्सच्या मॉडेल्सची नावे मात्र भूतांवरून का ठेवली जावीत याची अनेकांना उत्सुकता असेल.

रोल्स रोईस ही हँडमेड कार म्हणून ओळखली जाते. तिचे बहुतेक सुटे भाग हाताने बनविले जातात आणि म्हणून या कार्स महागही आहेत. कार्सच्या विविध भागाचे फिनिशिंग अतिशय काळजीपूर्वक केले जाते. इंटेरीअर अतिशय रॉयल आणि त्यातून हाताची कारागिरी उठून दिसणारी असते. शिवाय ग्राहकाच्या गरजेनुसार इंटेरीअर बनवून दिले जाते.

अश्या या सर्वांगसुंदर कार्सना भूताची नावे देण्यामागचे कारण मात्र मजेशीर आहे. या कारच्या इंजिनचा अजिबात आवाज येत नाही. त्यामुळे कार सुरु असतानाही एकदम शांत वाटते. म्हणजे ही कार समजा तुमच्या अगदी शेजारून गेली तरी तुम्हाला कळणार सुद्धा नाही. एखादे भूत आपल्याशेजारून गेले तर ते जसा अजिबात आवाज न करता जवळून जाते तश्याच या कार्स जातात. म्हणून त्यांना फँटम, रेथ, डॉन, घोस्ट अशी नावे दिली जातात असे सांगितले जाते.

Leave a Comment