सुंदर पण अजब परंपरा असेलेले बेट मादागास्कर


फोटो साभार लाईफ बेरी
जगाच्या नकाशात जेवढे म्हणून देश आहेत त्या प्रत्येकाची वेगळी ओळख आहे ती त्या त्या देशाची संस्कृती, परंपरा, राहणीमान यामुळे. जगातील चार नंबरचे मोठे द्वीप मादागास्कर हा असाच अनोखा आणि अजब देश आहे.

शेकडो वर्षापूर्वी आफ्रिका खंडाचा भाग असलेला हा देश पृथ्वीच्या पोटातील सरकत्या थरांमुळे आफ्रिका खंडापासून अलग झाला. त्यामुळे या बेटावर आढळणारे जीवजंतू, वनस्पती जगात अन्यत्र आढळत नाहीत असे सांगतात. या देशाचे खरे नाव मालागासी. स्थानिक लोक याच नावाने त्याच्या देशाची ओळख सांगतात. या बेटावर राहणारे ७५ टक्के स्थानिक जगात अन्यत्र कुठेही दिसत नाहीत.


या बेटावर अनेक विचित्र जीव आहेत. टेनरेक्स म्हणजे काटेरी उंदीर, चमकत्या खारी असे जीव. अर्थात तेही आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या बेटाला ग्रेट रेड आयलंड असेही म्हटले जाते कारण येथील माती लाल आहे मात्र ती शेतीसाठी योग्य नाही. येथे चुनखडीचे खडकही आढळतात. या बेटावर सर्वप्रथम कुणी पाउल टाकले याविषयी मतभेद आहेत. असे सांगतात की २ हजार वर्षापूर्वी येथे प्रथम इंडोनेशियन लोक आले आणि आफ्रिकन नंतर आले.


या बेटावर सणाच्या किंवा उत्सवाच्या दिवशी महिला, पुरुष, लहान मुले, वृध्द सगळे एक सारखेच कपडे घालतात. त्याला लांबा असे म्हटले जाते. लग्नात सुद्धा लांबा आणि मृतदेहाचे कफन सुद्धा लांबाच वापरला जातो.

Leave a Comment