व्हिस्कीची बाटली लिलावात करणार जागतिक रेकॉर्ड


फोटो साभार लाईफ बेरी
दारू जितकी जुनी तितकी महाग असे एक समीकरण आहे. जुन्या मद्याचा लिलाव करून त्या बहुतेक वेळा विकल्या जातात. असाच एक लिलाव या आठवड्याच्या अखेरी ऑस्ट्रेलियात पर्थ येथे होत आहे. या संदर्भातील रिपोर्ट नुसार व्हिस्की लिलाव कंपनी एक खुपच जुनी व्हिस्कीची बाटली लिलावात ठेवणार आहे. या बाटलीला विक्रमी १.२ दशलक्ष पौंड म्हणजे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत मिळेल असा विश्वास लिलाव कंपनीने व्यक्त केला आहे.

ही व्हिस्की ६० वर्षे जुनी मॅकलेन १९२६ फाईन अँड रेअर व्हिस्कीच्या २ हजार बाटल्यांपैकी एक आहे. पहिल्या दोन हजार बाटल्या गतवर्षी डिसेंबर मध्ये अश्याच लिलावात विकल्या तेव्हा त्यातून ३१ कोटी रुपये मिळाले होते. कोलोराडोचे मिस्टर गुडींग यांच्या खासगी संग्रहातील या बाटल्या असून गुडींग यांचा संग्रह जगातील एक मोठा संग्रह मानला जातो. त्यांच्या संग्रही द मॅकलेन बोवमॉर आणि स्प्रिंगबॅक डीस्टीलरीजच्या सुमारे चार हजार दुर्मिळ बाटल्या आहेत.

२०१४ मध्ये गुडींग यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळया लिलावात या बाटल्या विकल्या आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या पहिल्या लिलावात ५६ देशातील १६०० ग्राहक सामील झाले होते. आता या दुर्मिळ व्हिस्कीचा दुसरा हिस्सा लिलावात आणला गेला असून त्यातून किमान ६७ ते ७७ कोटींची रक्कम मिळेल आणि ते एक रेकॉर्ड ठरेल असा अंदाज आहे.

Leave a Comment