भाईजान सलमानची तिरंदाजी


फोटो साभार एनडीटीव्ही
देशात सध्या लॉकडाऊन असल्याने दबंग खान सलमान त्याच्या फार्म हाउस वर सेल्फ आयसोलेशन मध्ये आहे. विशेष म्हणजे तेथूनही तो अनेक व्हिडीओ शेअर करतो आहे आणि करोना विषयी जागृती करण्याचे काम करतो आहे. त्याचा लॉक डाऊन पूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यात सलमानचे तिरंदाजीतील कौशल्य दिसते आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केल्या गेलेल्या या व्हिडीओ मध्ये भाईजान धनुष्य ताणून बाणाने एकदम अचूक लक्ष्यभेद करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ ३ लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. सलमान करोना संकटात मदतीसाठी सतत जागरूक आहे. त्याने २५ हजार मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे त्याचबरोबर मुंबईतील रोजगारी करणाऱ्या मजुरांच्या जेवणाची सोय लावली आहे.

वर्क फ्रंट बाबत बोलायचे तर सलमानचा राधे रिलीज होण्याच्या मार्गावर आहे मात्र लॉक डाऊन मुळे तो ईद दिवशी रिलीज होऊ शकणार नाही. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पाटणी आणि रणदीप हुडा आहेत.

Leave a Comment