फिफा दिग्गज खेळाडूंकडून करोना वॉरीअर्स सन्मानार्थ टाळ्या


फोटो साभार दै. भास्कर
जगाची झोप उडविलेल्या करोना विरुद्ध चोवीस तास फ्रंटलाईनवर जीवाची बाजी लावून लढत असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस, लष्कर, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवक, वाहतूक कर्मचारी यांच्या सन्मानार्थ फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू पेले, मॅराडोना, रोनाल्डो सह ५० खेळाडूंनी टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद दिले. तसेच या लढाईत ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली दिली आहे.

शनिवारी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन म्हणजे फिफा ने या संदर्भातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात म्हटले गेले आहे, जगभर आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि पोलीस, सुरक्षा रक्षक रोज आपला प्राण धोक्यात घालून मानव जातीच्या रक्षणासाठी झटत आहेत त्या रिअल लाईफ हिरोंसाठी अगणित टाळ्या. १ मिनिट २५ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये सर्व आजी माजी खेळाडू टाळ्या वाजविताना दिसत आहेत.

त्यात पेले, माराडोना बरोबरच इंग्लंडचा डेव्हिड बेकहम, स्पेनचा सर्जियो रामोस, रोनाल्डो, ब्राझीलच काका, ब्राझीलचाच काफू दिसत आहेत तसेच भारताचा बाईचुंग भूटीयाही दिसत आहे. करोना विरुद्धच्या लढाईत ज्या आरोग्य आणि अन्य कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला त्याचे दुःख आहेच पण त्याचबरोबर कायदा रक्षक, मेडिकल दुकानदार, पुरवठा सेवा क्षेत्रातील लोक, वाहतूक कर्मचारी, सुरक्षा रक्षक हेच असली हिरो आहेत आणि आमचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे हा संदेश दिला गेला आहे.

Leave a Comment