आफ्रिकेतील स्वास्थ सुविधांची परिस्थिती भयावह


फोटो साभार जागरण
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ चे पुढचे पाउल आफ्रिकेत पडेल अशी भीती व्यक्त केली असतानाच आफ्रिकेतील स्वास्थ सुविधा अतिशय कमजोर आणि दिनवाण्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आफ्रिकेतील दहा देश असे आहेत की जेथे एकही व्हेंटिलेटर नाही. तसेच ४१ देशात मिळून जेमतेम २ हजार व्हेंटिलेटर आहेत.

अमेरिकेशी तुलना केली तर अमेरिकेत १,७००० व्हेंटिलेटर्स असूनही तेथील परिस्थिती भयावह आहे. आरोग्य संघटनेच्या रिपोर्ट नुसार बऱ्याच आफ्रिकन देशात मास्क, ऑक्सिजन, साबण, पाणी अश्या आधारभूत सुविधाही नाहीत. त्यामुळे करोनाचे संक्रमण थांबविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणे हेच या देशाच्या हाती आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार २०१५ पर्यंत फक्त १५ टक्के आफ्रिकी नागरिकांना हात धुण्याची सुविधा मिळाली होती. २०१७ पर्यंत लायबेरिया मध्ये ९७ टक्के घरात स्वच्छ पाणी आणि साबण सुद्धा नव्हता. आरोग्य सेवा तर नाहीच.

यामुळे करोनाचे पाउल आफ्रिकेत पडले असले तरी सध्या कर्फ्यू, वाहतूक निर्बंध यावरच अधिक भर आहे. सुदान या १.१० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पाच उपराष्ट्रपती आहेत पण व्हेंटिलेटर्स मात्र चारच आहेत.. मध्य आफ्रिकेतील गणराज्यात ५० लाख लोकसंख्येसाठी तीन व्हेंटिलेटर आहेत तर लायबेरियात सहा व्हेंटिलेटर असले तरी त्यातील एकाचा वापर अमेरिकन दूतावासासाठी केला जातो आहे.

Leave a Comment