डेव्हिड वॉर्नरचा मुलीसोबत या बॉलिवूड गाण्यावर तुफान डान्स

कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरात लॉकडाऊन आहे. यामुळे सर्वच क्रिडा स्पर्धा देखील रद्द झाल्याने खेळाडू घरी आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवत आहे. एखादा खेळाडू कलाकार बनत आहे तर काही डान्स व्हिडीओ शेअर करत आहे. आता ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने आपल्या लेकीसोबतच डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विशेष म्हणजे वॉर्नर या व्हिडीओमध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करत आहे. वॉर्नरने काही दिवसांपुर्वीच टीकटॉकवर एंट्री केली आहे.

वॉर्नर आणि त्याची मुलगी इंडी कैटरिना कैफचे गाणे शिला की जवानीवर धमाल डान्स करत आहेत. व्हिडीओमध्ये वॉर्नरची मुलगी भारतीय ड्रेसमध्ये दिसत आहे. वॉर्नरने डान्सचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून, या व्हिडीओला आतापर्यंत 18 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे.

View this post on Instagram

😂😂 somebody help us please!!

A post shared by David Warner (@davidwarner31) on

दरम्यान, या वर्षीच्या आयपीएल सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद वॉर्नरकडे होते. मात्र कोरोनामुळे या वर्षीचे आयपीएल पुढे ढकलण्यात आले आहे.

Leave a Comment