आता पालक कंट्रोल करू शकणार मुलांचे टिक-टॉक अकाउंट

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिक-टॉकवर मुले खूप अधिक वेळ घालवतात अशी पालकांची सतत तक्रार असते. सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे अ‍ॅप योग्य नसल्याचे म्हटले जाते. मात्र आता लवकरच मुलांच्या सुरक्षेचे दृष्टीने टिक-टॉक खास फीचर आणणार आहे. हे फीचर फॅमिली पेयरिंग असून, याच्या मदतीने आई-वडील स्वतःचे टिक-टॉक अकाउंट मुलांच्या अकाउंटशी लिंक करू शकतील. या फीचरद्वारे पालकांकडे मुलांच्या अकाउंटचे पुर्ण कंट्रोल असेल.

याशिवाय कंपनी 16 वर्षांपेक्षा कमी युजर्ससाठी डायरेक्ट मेसेज फीचर बंद करण्याचा विचार करत आहे.

फॅमिली पेयरिंग फीचरद्वारे आई-वडील स्वतःचे अकाउंट मुलांच्या अकाउंटशी लिंक करू शकतात. पालकांकडे मुलांच्या अकाउंटचे डायरेक्ट मेसेज, स्क्रीन टाईम, रिस्ट्रिक्टेड मोड सारख्या फीचर्सचे कंट्रोल असेल.

कंपनी 30 एप्रिलनंतर अ‍ॅपवरील डायरेक्ट मेसेजिंग फीचर हटवणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे.

Leave a Comment