कोरोनामुळे गमावली नोकरी,मात्र 23 कोटींच्या लॉटरीने बदलले नशीब

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत लाखो लोकांना नोकरी गमवावी लागत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच बाबा झालेल्या एका विशीतील व्यक्तीला देखील या काळात आपली नोकरी गमवावी लागली आहे. मात्र कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे याची चिंता असताना या व्यक्तीला कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे.

व्यक्तीच्या नावाचा अद्याप खुलासा झाला नसून, व्यक्तीला ऑस्ट्रेलियातील द लॉटच्या लॉटरीमध्ये कोट्यावधींचे बक्षीस मिळाले आहे. पिता झालेल्या या व्यक्तीला तब्बल 2.4 मिलियन पाउंड (जवळपास 23 कोटी रुपयांची) लॉटरी लागली आहे. पुढील 20 वर्ष या कुटुंबाला महिन्याला 10,200 पाउंड मिळणार आहेत.

व्यक्तीने सांगितले की, मी ऑनलाईन तपासल्यावर लॉटरी जिंकल्याचे आढळले. मी बायकोला झोपेतून उठवून हे सांगितल्यावर ती किंचाळलीच. हे खरचं अविश्वसनीय आहे. मी हे खरे आहे का हे पाहण्यासाठी अनेकदा ऑनलाईन अकाउंट तपासले.

त्याने सांगितले की, आम्ही यानंतर क्षणभर देखील झोपलो नाही. रात्रभर टिव्ही बघत जागलो आणि यानंतर काय करायचे याविषयी बोलत राहिलो. हा खरचं सुंदर अनुभव आहे. आम्ही बाळ झाले असून, लॉटरीमुळे आम्हाला आमचे आयुष्य सावरण्यास नक्कीच मदत मिळेल.

कोव्हिड-19 मुळे नोकरी गमवाली आहे. अशा स्थितीमध्ये लॉटरीमुळे नक्कीच आनंद झाला असल्याचे, व्यक्तीने सांगितले.

आपल्या पत्नीच्या योजनांबद्दल सांगताना तो म्हणाला की, तिला आता सर्वकाही करायचे आहे. नवीन कार, हॉलिडे, नवीन घर, फक्त घर नाहीतर स्वप्नातले घर घ्यायचे आहे आणि खूप शॉपिंग करायची आहे.

Leave a Comment