लॉकडाऊन : बंद हॉटेलमध्ये राहत व्यक्तीने केली चक्क लाखो रुपयांची उधळपट्टी

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीमध्ये अत्यावश्यक सेवासोडून सर्व काही बंद आहे. नागरिक घरात कैद असताना एक व्यक्ती चक्क बंद हॉटेलमध्ये घुसून तेथे 4 दिवस राहिला. या दिवसात तेथे त्याने लाखो रुपयांचे जेवण खाल्ले आणि दारू पिली. अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्यातील न्यू हेवन शहरात ही घटना घडली असून, या संदर्भात 42 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक करत, जेलमध्ये पाठवले आहे.

ऑर्टिज नावाचा व्यक्ती सोल डे कुबा नावाच्या हॉटेलमध्ये घुसला होता. हे हॉटेल लॉकडाऊनमुळे बंद होते. मॅनेजरने या संदर्भात अनोळखी व्यक्ती हॉटेलमध्ये घुसल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना त्याच्याकडे रमची बाटली देखील सापडली.

हॉटेल मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की, या दिवसांमध्ये त्याने लाखो रुपयांचे जेवण खाल्ले आणि दारू पिली. मॅनेजमेंटनुसार, ऑर्टिजने 70 दारूच्या बाटल्या पिल्या अथवा चोरी केल्या.

सीसीटिव्हीद्वारे समोर आले की, आरोपी 11 एप्रिलला खिडकीद्वारे बंद हॉटेलमध्ये घुसला. बाहेर पडताना त्याने सोबत जेवण, दारू असे अनेक सामान सोबत नेले.

Leave a Comment