शेतकऱ्यांसाठी सरकारने लाँच केले ‘किसान रथ’ अ‍ॅप, पिकांची विक्री होणार सोपी

कोरोना व्हायरसमुळे सरकारने देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना आपले पीक, भाजीपाला विकण्यास समस्या निर्माण होत आहे. शेतकऱ्यांची ही समस्या बघून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषि उत्पादनांच्या परिवहनात अडचण येऊ नये म्हणून किसान रथ मोबाईल अ‍ॅप लाँच केला आहे. किसान रथ अ‍ॅपद्वारे शेतकरी आणि व्यापारी सहज पिकांची खरेदी-विक्री करू शकतात.

शेतकरी गुगल प्ले-स्टोरवरून हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करू शकता. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर नाव, मोबाईल नंबर आणि आधार नंबर सारखी खाजगी माहिती देत रजिस्ट्रेशन करावे लागेल.

व्यापारी देखील स्वतःची माहिती देत रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशननंतर मोबाईल नंबर आणि पासवर्डद्वारे  अ‍ॅपमध्ये लॉगइन करता येईल. किसान रथ अ‍ॅप इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तामिळ, कन्नड आणि तेलगू भाषेत उपलब्ध आहे.

सरकाने या अ‍ॅपला लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे खरेदी विक्रीसाठी लाँच केले आहे. जेणेकरून शेतकरी आपला माल सहज विकू शकतील व व्यापारी खरेदी करू शकतील. या अ‍ॅपद्वारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना परिवहन वाहनांची माहिती मिळेल. अ‍ॅपमध्ये ट्रकच्या येण्याचा वेळ आणि स्थानाबद्दल माहिती मिळेल. या अ‍ॅपद्वारे ट्रांसपोटर्स देखील सामानाच्या वाहतुकीसाठी गाडीचे रजिस्ट्रेशन करू शकतील.

Leave a Comment