असे करा तुमचे झूम अ‍ॅप अकाउंट डिलीट

लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंह अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाईन क्लासेस, ऑफिसच्या मिटिंग्ससाठी झूम अ‍ॅप वापरले जात आहे. मात्र हे अ‍ॅप सुरक्षित नसल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. या आधी देखील झूम अ‍ॅपच्या प्रायव्हेसी आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जर तुम्हाला देखील प्रायव्हेसीचा धोका वाटत असेल आणि झूम अ‍ॅप्स डिलीट करायचे असल्यास, स्टेप्स जाणून घ्या.

कसे डिलीट कराल झूम अ‍ॅप (फ्री युजर्स) ?

झूम अ‍ॅपवरून तुम्ही अकाउंट डिलीट करू शकत नाही. यासाठी तुम्हाला लॅपटॉपच्या ब्राउजरवर जाऊन झूम वेब पोर्टलवर लॉगइन करावे लागेल. डाव्या बाजूला अकाउंट मॅनेजमेंटवर क्लिक करा. येथे अकाउंट प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर Terminate Your Account चा पर्याय दिसेल. यानंतर झूम अ‍ॅप तुम्हाला दोनदा कंफर्म करण्यास सांगेल. कंफर्म केल्यानंतर तुमचे अकाउंट बंद करण्यात आले, असा मेसेज स्क्रिनवर दिसेल.

पेड युजर्ससाठी –

पेड युजर्सनी अकाउंट डिलीट करण्यासाठी डेस्कटॉप अथवा लॅपटॉपवर ब्राउजरमध्ये झूम वेब पोर्टलवर लॉगइन करावे. डाव्या बाजूला अकाउंट मेनेजमेंटवर क्लिक केल्यानंतर बिलिंग पर्याय दिसेल. येथे स्बस्क्रिप्शन रद्द करण्यासाठी क्लिक करावे व ऑटो रिनअल बंद करा.

झूम अ‍ॅप का सोडत आहात ? असा प्रश्न विचारला जाईल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार उत्तर देऊ शकता.  यानंतर अकाउंट रिन्युअल संपल्यावर तुमचे अकाउंट फ्री युजर्ससाठी असलेल्या स्टेप्स वापरून बंद करू शकता.

Leave a Comment