लवकरच येणार आहे गुगलचे स्मार्ट डेबिट कार्ड

भारतात गुगल पे द्वारे डिजिटल पेमेंटवर मजबूत पकड बनविल्यानंतर आता गुगल लवकरच स्मार्ट फिजिकल आणि व्हर्च्युअल डेबिट कार्ड लाँच करण्याच्या तयारीत आहे. गुगलचे हे स्मार्ट डेबिट कार्ड अ‍ॅपलच्या क्रेडिट कार्डला टक्कर देईल.

गुगलचे या डेबिट कार्डमध्ये अनेक खास फीचर्स असतील. ज्यात ब्लूटूथद्वारे पेमेंटचा पर्याय असेल. या स्मार्ट कार्डचे नाव गुगल कार्ड असेल. याचा उपयोग करून मोबाईलद्वारे शॉपिंगपासून ते बँक बॅलेंस चेक करता येईल. हे कार्ड अ‍ॅपशी देखील कनेक्ट होईल. सध्या यासाठी गुगल सिटी बँक आणि स्टेनफोर्ड फेडरल क्रेडिट यूनियनशी चर्चा करत आहे.

गुगलचे हे स्मार्ट डेबिट कार्ड बँक अकाउंटशी कनेक्ट केल्यानंतर युजर मोबाईलद्वारे पेमेंट करू शकतील. कार्ड रिडरद्वारे फिजिकल कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येईल. याशिवाय व्हर्च्युअल कार्डद्वारे ब्लूटूथद्वारे पेमेंट करता येईल. याला एकप्रकारे ब्लूटूथ पेमेंट देखील म्हणता येईल.

हे कार्ड गुगल अ‍ॅपशी कनेक्ट असल्याने अ‍ॅपद्वारेच सर्व व्यवहार पाहता येतील. गुगल पे च्या यशानंतर गुगलने आर्थिक क्षेत्रात देखील रुची दाखवण्यास सुरूवात केली आहे. भारतात गुगल पे चे कोट्यावधी ग्राहक आहेत.

Leave a Comment