बबिता फोगाटवर स्वरा भास्करच्या प्रश्नांची सरबत्ती


महिला कुस्तीपटू बबिता फोगाट सोशल मीडियाच्या माध्यमातून तबलिगी जमातीवर थेट निशाणा साधल्यामुळे सध्या चर्चेत आली आहे. भारतातील कोरोना दुसऱ्या क्रमांकावर असून तबलिगी जमात पहिल्या क्रमांकावर असल्याचे वक्तव्य तिने केले होते. देशभरातील नागरिकांमधून तिच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत असून बबिता फोगाटला बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करत पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर याविषयी काही मुद्दे सांगून काही प्रश्न देखील उपस्थित करत त्याचे उत्तरही मागितले आहे.


बबिता जी, आपण जरा या आकडेवारीवर पण जरा लक्ष द्या! या लाखो जणांची कोरोना चाचणी झाली असेल ? कृपया यावर तुमचे काय मत आहे ते सांगा आणि दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी कशी दिली हा प्रश्नदेखील नक्की उपस्थित करा. बाकी मी तर तुमची चाहती असल्याचे स्वराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आहे.

तबलिगी जमातीवर बबिता फोगाटने निशाणा साधल्यानंतर काही हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड झाले यात काहींनी बबिताला पाठिंबा दिला होता. तर काहींनी मात्र तिच्यावर टिकास्त्र डागले आहे. बबिता फोगाटने काही दिवसांपूर्वी एक ट्विट करत तबलिगी जमातीवर निशाणा साधला होता. तिने यात म्हटले होते की, कोरोना व्हायरस भारतातील दुसऱ्या क्रमांकाची समस्या आहे. तिच्या या ट्विटवर मोठा वाद झाला आहे. कारण तिने पहिल्या क्रमांकावर तबलिगी जमात असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. यानंतर तिला ट्रोल केले जात असून ट्विटरला #SuspendBabitaPhogat, #बबीता_फोगाट हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

Leave a Comment